Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : लाडकी बहीणचे पैसे २१०० रुपये करणार, दादांनी जाहीरनाम्यात केला...

Ajit Pawar : लाडकी बहीणचे पैसे २१०० रुपये करणार, दादांनी जाहीरनाम्यात केला नवा वादा

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द होत आहे. यामध्ये अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठा वादा केला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येणार असं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून २१०० रुपये करणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे.

लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवणार

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जाहीरनामा प्रसिध्द करताना म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. काही बदल करणाऱ्या योजना आम्ही मागच्या ४ महिन्यात केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत. स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांच काम मांडलेले असणार आहे. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला २५ लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. ९८६१७१७१७१ हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. तालुका स्तरीय जाहीरनामा यावर ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही २१०० रुपये करणार आहोत. २ कोटी ३० लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

आम्ही शेतकरी सन्मान योजना १५ हजार रुपये करणार

आम्ही शेतकरी सन्मान योजना १५ हजार रुपये करणार आहोत. कर्जमाफी आणि अतिरिक्त अनुदान आम्ही देणार आहोत. २० टक्के अधिक अनुदान असेल. राज्यातल्या ग्रामीण भागात ४५ हजार पानंद रस्ते करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीरनाम्यात काय आहे?

लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना १५०० हजर नाही तर तब्बल २१०० रुपये देण्यात येणार आहे.

महिला सुरक्षेसाठी सोबत २५ हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजर रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ग्रामीण भागात ४५००० पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा करण्यात आलेला आहे.

अजित दादांच्या पक्षाकडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती २०% अनुदान देण्याचा वादा करण्यात आलेला आहे.

वीज बिलात ३० % कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे.

वृद्ध पेन्शन धारकांना आता १५०० वरुण महिन्याला २१०० रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला १०,००० रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे.

२५ लाख रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -