Saturday, May 10, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

महाविकास आघाडीचा घोषणांचा पाऊस, महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार रूपये

महाविकास आघाडीचा घोषणांचा पाऊस, महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार रूपये

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. यातच बुधवारी महाविकास आघाडीने आपल्या पाच घोषणा जाहीर केल्या आहेत. यात महिलांना दर महा आर्थिक साहाय्य, कुटुंबासाठी आरोग्य विमा यांचा समावेश आहे.


खरंतर, महाविकास आघाडीमध्ये सामील पक्ष-काँग्रेस, शिवसेना(उद्धव ठाकरे), एनसीपी(शरद पवार) या नेत्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन केले. यात सर्व नेते सामील झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या दरम्यान निवडणुकीसाठी आपले संकल्प पत्र जारी केले आहे.



या आहेत पाच घोषणा


महालक्ष्मी - महिलांना दरमहा ३ हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी वाहनांमध्ये मोफत प्रवास.


कृषी समृद्धी - संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कृषी कर्ज माफ केले जाईल. याशिवाय सातत्याने कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.


युवकांना शब्द - महाराष्ट्रातील दर बेरोजगार तरुणांना दरमहा ४ हजार रूपयांचे मासिक सहाय्य प्रदान केले जाईल.


कुटुंब रक्षण - महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना २५ लाख रूपयांचा आरोग्य विमान प्रदान केला जाईल. सरकारी रुग्णालयात आवश्यक औषधे मोफत प्रदान केली जातील.


समानतेची हमी - महाराष्ट्रात सामाजिक-आर्थिक जाती जनगणना आयोजित केली जाईल.



२० नोव्हेंबरला होणार मतदान


महाराष्ट्रात यंदा २८८ विधानसभेच्या जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, एनसीपीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या.

Comments
Add Comment