मुंबई: नोव्हेंबर सुरू होताच हवामानात बदल होऊ लागले. हलकी हलकी थंडी जाणवू लागली आहे. उत्तर भारतात येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये थंडी वाढू शकते. अशताच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार थंडीच्या मोसमात स्वाभाविकपणे इम्युनिटी वाढते. थंडीच्या हवामानात शरीराचे तापमान कमी होते आणि शरीर नव्या मोसमानुसार अनुकूल होण्यासाठी थर्मोरेग्युलेशनमधून जात असते.
कधी कधी हे बदल थंडीच्या दिवसांत अनेक आजारांनाही आमंत्रण देऊ शकते. मात्र तुम्ही काही सावधानता बाळगली तर यापासून बचाव होतो. जाणून घ्या कोणत्या पद्धतीने तुम्ही थंडीच्या दिवसांत हेल्दी राहू शकता.
हेल्दी डाएट
अख्खे धान्य, मासे, चिकन, ड्रायफ्रुट, सीड्स, मसाले, ताजी फळे आणि भाज्यांचा बॅलन्स डाएट घेतल्यास इम्युनिटी वाढते. व्हिटामिन सीने परिपूर्ण असलेल्या खाद्य पदार्थांचे अधिक सेवन केले पाहिजे कारण यामुळे इम्युनिटी वाढते.
एक्सरसाईज
थंडीच्या दिवसाता स्वत:ला फिट ठेवण्यासाठी फिजीकल अॅक्टिव्हिटी करणे गरजेचे आहे. योगा, रनिंग, वॉकिंग अथवा स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे तुम्ही शरीराला गरम ठेवू शकता. यामुळे फ्लू, सर्दीसारख्या आजारांपासून बचाव करता येतो.
मॉश्चरायजर
थंडीत आपला त्वचा कोरडी पडते. त्यामुळे खाजही येते. ओठ फाटतात. थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉश्चरायजर लावायला विसरू नका.
पाणी
दरदिवशी पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे आणि हायड्रेट राहिले पाहिजे. पाण्यामुळे आपल्या पोटाची सिस्टीम साफ होते तसेच विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.
झोप
चांगली झोप शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वस्थ राखण्यास मदत करतात. यामुळे तणाव हार्मोन कॉर्टिसोलला कमी करते. चांगल्या आरोग्यासाठी झोप अतिशय गरजेची आहे. यामुळे कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे.