Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीAssembly Election 2024 : मुंबईतील प्रत्येक कामगाराला मतदानादिवशी पगारी सुट्टी द्या, अन्यथा...

Assembly Election 2024 : मुंबईतील प्रत्येक कामगाराला मतदानादिवशी पगारी सुट्टी द्या, अन्यथा…

आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यभरात सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) रणसंग्रामाचे येत्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. यासाठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान (Voting) होणार असून त्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई क्षेत्रातील आयुक्तांनी मुंबईत सर्व कामगारांना मतदाना दिवशी सुट्टी देण्याचे निर्देश जारी केले आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या नियोक्त्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे निर्देश देखील जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

काय आहेत निर्देश?

  • निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणतेही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा अन्य कोणत्याही आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुटी द्यावी.
  • सर्व उद्योग समूह, महामंडळ, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना हा नियम लागू राहील.
  • या सुटीच्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही. या नियमांचे किंवा तरतुदींचे कोणत्याही नियोक्त्याने उल्लंघन केल्यास त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल.
  • लोक प्रतिनिधित्व अधिनियम- १९५१ च्या कलम १३५ (ख) नुसार, एखाद्या मतदाराची नोकरीवरील अनुपस्थिती ही तो ज्या नोकरीवर असेल त्या नोकरीच्या संदर्भात धोकादायक किंवा हानिकारक ठरणार असेल, अशा कोणत्याही मतदारावर उल्लंघनात्मक कारवाई केली जाणार नाही.
  • तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, कर्मचारी, अधि कारी आदींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पूर्ण दिवसाची सुटी देणे शक्य नसल्यास त्यांना किमान चार तासांची सवलत देता येईल. परंतु, अशाप्रकारच्या सवलत प्रकरणांमध्ये, जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
  • सुटी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने एखाद्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नियोक्त्याविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल. त्यामुळे, उद्योग विभाग अंतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आदी आस्थापनांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून दिलेल्या या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -