पाहा कोणाला मिळाले कोणते चिन्ह?
सिंधुदुर्ग : राज्यभरात सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ असून या निवडणुकीसाठी १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना आज पक्ष व चिन्हाचे वाटप करण्यात आले. जाणून घ्या कोणाला कोणते चिन्ह मिळाले.
कणकवली विधानसभा मतदार संघ
- चंद्रकांत आबाजी जाधव- बहुजन समाज पार्टी (हत्ती)
- नितेश नारायण राणे- भारतीय जनता पार्टी (कमळ)
- संदेश भास्कर पारकर- उबाठा शिवसेना (मशाल)
- गणेश अरविंद मान- अपक्ष (ट्रक)
- नवाझ ऊर्फ बंदू खानी- अपक्ष (बॅट)
- संदेश सुदाम परकर- अपक्ष- (चिमणी)
कुडाळ विधानसभा मतदार संघ
- कसालकर रवींद्र हरिश्चंद्र- बहुजन समाज पार्टी (हत्ती)
- नाईक वैभव विजय- उबाठा शिवसेना (मशाल)
- निलेश नारायण राणे- शिंदे शिवसेना (धनुष्यबाण)
- अनंतराज नंदकिशोर पाटकर- महाराष्ट्र स्वराज्य पार्टी (पेनाची निब सात किरणांसह)
- उज्वला विजय येळाविकर- अपक्ष (शिट्टी)
सावंतवाडी विधानसभा मतदार संघ
- दिपक वसंतराव केसरकर – शिंदे शिवसेना (धनुष्यबाण)
- राजन कृष्णा तेली- उबाठा शिवसेना (मशाल),
- अर्चना घारे परब- अपक्ष (लिफाफा)
- दत्ताराम विष्णू गांवकर- अपक्ष (शिवण यंत्र)
- विशाल प्रभाकर परब- अपक्ष (गॅस शेगडी)
- सुनिल ऊर्फ यशवंत वसंत पेडणेकर- अपक्ष (फलंदाज)