दिवाळी बोनस मिळालाय? असा करा त्याचा वापर

मुंबई: दिवाळीच्या निमित्ताने कोट्यावधी नोकरपेशा व्यक्तींना कंपनीकडून बोनस दिला जातो. अनेकजण दिवाळी बोनस खरेदीवर उडवून टाकतात. तुम्हीही असेच करताय का? तर थांबा. दिवाळीच्या बोनसची रक्कम ही तुम्ही योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचा तुम्हाला फायदाच होऊ शकतो. या स्मार्ट पद्धतीने करा बोनसचा वापर...



लोनचे प्री पेमेंट


दिवाळी बोनसचा वापर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तुमच्या लोनच्या प्री पेमेंटसाठी करू शकता. यामुळे तुमच्या बँक लोनची प्रिन्सिपल अमाऊंट कमी होईल. यामुळे भविष्यात ईएमआयची रक्कम कमी होते.



मुलांच्या नावावर बँक एफडी


दिवाळीचा बोनसचा एक भाग अथवा संपूर्ण रक्कम तुम्ही बँकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये टाकू शकता. एफडीवर तुम्हाला वर्षाला चांगले व्याज मिळेल. ही रक्कम पुढे वाढत जाते. याशिवाय दीर्घकाळामध्ये वाढलेली ही रक्कम मुलांचे शिक्षण आणि लग्नासाठी वापरता येऊ शकते.



सोन्यामध्ये गुंतवणूक


दिवाळी बोनसचा वापर तुम्ही सोन्याच्या खरेदीमध्येही करू शकता. सोन्यामधील गुंतवणूक ही सर्वात फायदेशीर आणि सुरक्षित मानली जाते.



इर्मजन्सी फंड


आयुष्यात कधी आपल्याला पैशांची गरज पडू शकते हे सांगता येत नाही. अशातच आपल्या इर्मजन्सी फंड असणे गरजेचे आहे. त्यामुळे बोनसमध्ये मिळालेल्या पैशांचा वापर तुम्ही इर्मजन्सी फंडसाठी करू शकता.

Comments
Add Comment

Mumbai Local Train : आता लोकल ट्रेनवर सुध्दा CCTV कॅमेरे मध्य रेल्वेचा निर्णय; पण CCTV का जाणुन घ्या ?

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या सुरक्षेच्या दृष्टीने मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय

एमपीसीबीचा ओसाखा सिटी प्रशासनासोबत सामंजस्य करार

मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) जपानच्या

लोकमान्य टिळक मंडईतील विक्रेत्यांवर कारवाई

नूतनीकरणावरून वाद तीव्र मुंबई : लोकमान्य टिळक मंडईमध्ये कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता वाढीव बांधकामावर

टोल थकबाकीमुळे वाहन सेवा थांबणार

एनओसी, फिटनेस प्रमाणपत्र व नॅशनल परमिटवर बंदी मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी

गुन्ह्यांच्या रेकॉर्डमुळे तुमचे करिअर उद्ध्वस्त झाले

सत्र न्यायालयाचा एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना गंभीर इशारा मुंबई : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल

प्रशासनालाच पडला पालिका सभागृहाच्या निर्णयाचा विसर

नगरसेवकांची हजेरी बायामेट्रिक पद्धतीने सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पुस्तिकेवरील