Monday, December 9, 2024
Homeताज्या घडामोडीउपमुख्यमंत्री फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे; आमदार नितेश राणे यांनी...

उपमुख्यमंत्री फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे; आमदार नितेश राणे यांनी उदाहरणासहित केले स्पष्ट

मातोश्रीचा लाडका असलेला असीम सरोदेने अरबी समुद्रातील स्मारक न्यायालयात याचिका दखल करून अडवले

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आधी स्मारक उभे करण्याची हिंमत दाखवा

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे द्वेषी आहेत. याच लोकांनी स्वतःच्या मुखपत्रातून मुका मोर्चाचे कार्टून छापून माता-भगिनींचा अपमान केला. मातोश्रीचा लाडका जावई असलेला वकील असीम सरोदे जो उद्धव ठाकरेंची प्रत्येक केस लढतो त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारका विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आणि ते स्मारक अडकवून ठेवले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची लायकी तरी आहे का? असा संतप्त सवाल भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला.

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलताना आमदार निलेश राणे यांनी ठाकरे राऊत यांचा समाचार घेतला. आमदार नितेश राणे म्हणाले, छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याची ज्याची लायली नाही ते फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. मुघलांची पिलावळ महाराजांच्या स्मारका बद्धल आम्हाला शिकवणार? ज्याच्या मुळे अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ शकले नाही तो असीम सरोदे कोणाचा जावई आहे.हिम्मत असेल तर अरबी समुद्रात होणाऱ्या महाराजांच्या स्मारका बाबतची याचिका मागे घेण्यास असीम सरोदे ला उध्दव ठाकरे यांनी सांगावे.

उद्धव ठाकरे ५० लाख रुपये आमच्या मालवण मधील छत्रपतींच्या मंदिरास देणार होता. त्याचा विसर पडला आहे का? आता उद्धव ठाकरे यांचा गजनी झाला आहे का ? ते आधी पैसे द्या आणि मंदिरे बांधण्याची भाषा करा, असा सवालही यावेळी त्यांनी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -