Thursday, December 12, 2024
Homeक्रीडारोहितच्या नेतृत्वात खेळणार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी...१८ वर्षांनी परततेय ही स्पर्धा

रोहितच्या नेतृत्वात खेळणार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी…१८ वर्षांनी परततेय ही स्पर्धा

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात परदेशी खेळाडूंना खेळताना आपण साऱ्यांनीच पाहिले आहे. आयपीएलमध्ये ही बाब सामान्य आहे. मात्र जर एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोहित शर्मा अथवा विरा कोहली कर्णधार असेल आणि त्याच्या नेतृत्वात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, मेहदी हसन आणि मथीशा पथिराणासारखे खेळाडू खेळताना दिसले. हे काही स्वप्न नाही तर एका प्लानचा भाग आहे. हा प्लान लवकरच सत्यात उतरणार आहे.

आफ्रिकी क्रिकेट असोसिएशनची नुकतीच झालेल्या एजीएममध्ये अफ्रो-आशिया कप पुन्हा करण्याबाबत चर्चा झाली. ही स्पर्धा याआधी २००५ आणि २००७मध्ये आयोजित करण्यात आली आहे. जर आफ्रिकेच्या बोर्डाचा हा प्लान काम करत असेल तर लवकरच याची तिसरी आवृत्ती पाहायला मिळू शकते.

क्रिकेट प्रेमींना आफ्रिका-आशिया कपमध्ये आफ्रिकन इलेव्ह आणि आशियाई इलेव्हन यांच्यातील सामना पाहायला मिळेल. आफ्रिकन इलेव्हनम्ये अधिकतर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचे खेळाडू सामील असतात. तर आशियान इलेव्हनमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानचे खेळाडू दिसू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -