Friday, December 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमराठी भाषा रेल्वेत चालणार नाही, नालासोपाऱ्यात टीसीचा मुजोरपणा उघडकीस; मनसेची ही भूमिका

मराठी भाषा रेल्वेत चालणार नाही, नालासोपाऱ्यात टीसीचा मुजोरपणा उघडकीस; मनसेची ही भूमिका

मुंबई : इथे प्रामुख्याने मराठी बोलणारी लोकं राहतात. मात्र याच राज्यात, शहरातही मराठी बोलणाऱ्यांची अनेकदा गळचेपी होत असते. अशातच नालासोपारा येथून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वेतील टीसीने नालासोपारा येथे दादागिरी केल्याचं उघड झालंय. रेल्वेत मराठी बोलणार नसल्याची लेखी हमी घेतल्याचा आरोप दाम्पत्याने केला होता. अखेर मराठी एकीकरण समितीच्या ठिय्याला यश मिळालं आहे. हिंदी भाषिक टीसीचे नाव रितेश मौर्या असं आहे. घडलेला हा प्रकार समजताच मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

हा सर्व प्रकार रविवारी रात्री ८.३० ते ९च्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासी अमित पाटील आणि त्यांच्या पत्नी सोबत घडला आहे. ही घटना वसई विरार मराठी एकीकरण समितीला समजताच नालासोपारा रेल्वेस्थानाकात सोमवारी मराठी एकीकरण समितीने ठिय्या आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला जाब विचारला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथे या टीसीची दादागिरी पहायला मिळाली. मराठी दांपत्याला टीसीच्या कार्यालयात डांबून ठेवण्यात आलं. मराठी दांपत्याकडून रेल्वेमध्ये मराठी बोलणार नाही असं लिहून घेण्यात आलं असा आरोपही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अफाट व्हायरला झाला आहे. या प्रकरणामुळे मोठा संताप व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं ?

रेल्वेस्थानाकात टीसीने अमित पाटील दाम्पत्याला तिकीट तपासणीसाठी अडवले असता त्यांना टीसीची भाषा समजली नाही. त्यांना मराठी बोलण्यास सांगितले तर हम इंडियन है हिंदी मे बोलेंगे, रेल्वे मे मराठी नही चलेगा अशी धमकी देत त्यांना आरपीएफ कार्यालयात बसवून ठेवले. इतकंच नाही तर अमित पाटील दामपत्याकडून मराठी न बोलण्याचे लेखी लिहून घेतले होते. तर अमित पाटील यांच्या पत्नीने काढलेला व्हिडीओ ही जबरदस्तीने डिलीट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मनसेची आक्रमक भूमिका

मनमानी कारभार सुरू आहे. ठोस भूमिका घ्यायला कुणी तयार नाही. मराठी माणसांसाठी लढणारी आणि संघर्ष करणारी मनसे आहे. सत्तेत बसणारा पक्ष आहे त्यांनी या गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले नाही तर जनतेने त्यांना सत्तेतून उतरवायला हवं अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे.

तात्पुरतं त्या टीसीचे निलंबन

दरम्यान, रेल्वेने या प्रकरणाची दखल घेतली आहे. मराठी दांपत्याला अशी वागणूक देणाऱ्या, मुजोरपणे वागणाऱ्या त्या टीसीचे वागणे उघडकीस आल्यावर मराठी एकीकरण समितीने उठावा केला. तिकीट तपासनीस त्यानंतर रितेश मोर्या याचे तात्पुरत्या स्वरूपात निलंबन करून, वरीष्ठ रेल्वे अधिकारी यांना रिपोर्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -