आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपचा झेंडा हाती
वैभववाडी : ऐनारी येथील उबाठा गटाच्या ग्रामपंचायत सदस्या वैशाली विलास जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये विलास राजाराम जाधव, रसिक रवींद्र विचारे व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले.
वैभववाडी येथील भाजपा कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, शारदा कांबळे, प्राची तावडे, संजय सावंत, प्रदीप जैतापकर, बंड्या मांजरेकर, दाजी पाटणकर व पदाधिकारी उपस्थित होते.