मुंबई : बँकेकडून ऑनलाईन सेवा सुरू झाल्यापासून सर्वत्र डिजिटल पेमेंटचा वापर केला जातो. अशातच यूपीआयमुळे (UPI Payment) सर्वांनाच फायदा झाला आहे. दरम्यान, एचडीएफसी बँकेमधील (HDFC) यूपीआय सर्व्हिसबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात एचडीएफसी बँकेची यूपीआय सर्व्हिस दोन दिवस बंद राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेच्या मेंटेनेंसच्या कामासाठी यूपीआय सर्व्हिस बंद राहणार आहे, अशी माहिती बँकेने दिली.
एचडीएफसी बँकेची यूपीआय सर्व्हिस ५ नोव्हेंबर म्हणजेच आज रात्री १२ वाजल्यापासून ते सकाळी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी १२ वाजल्यापासून ते ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
कशावर होणार परिणाम?
एचडीएफसी बँकेच्या करंट आणि सेव्हिंग अकाउंट तसेच रुपये क्रेडिट कार्डच्या संबंधित सर्व यूपीआय व्यव्हार बंद राहणार आहे. याचा परिणाम एचडीएफसी मोबाइल बँकिंग ॲप, गुगल पे, व्हॉट्सॲप पे, पेटीएम, श्रीराम फायनान्स, क्रेडिट पे या प्लॅटफॉर्मवर होणार आहे.