नवी दिल्ली : लोकसभेचे १८ वे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संयुक्त अधिवेशन होणार आहे.
जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हे अधिवेशन होणार आहे. संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे., अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करून दिली आहे.
दरम्यान २६ नोव्हेंबर रोजी संविधान स्वीकारल्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जाणारा संविधान दिनाचा कार्यक्रम संविधान सदनच्या सेंट्रल हॉलमध्ये साजरा केला जाईल, असे देखील ट्विट संसदीय कामकाज मंत्री रिजिजू यांनी आपल्या ट्विटर संदेशात नमूद केले आहे.