Monday, December 9, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसुनील राऊत हे करंजेची कत्तल करायला कसाई पाठवणार, निवडणूक आयोगाने रक्षण करावे

सुनील राऊत हे करंजेची कत्तल करायला कसाई पाठवणार, निवडणूक आयोगाने रक्षण करावे

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

महिलेचा अवमान करणाऱ्या सुनील राऊतची उमेदवारी रद्द करा

मुंबई : विक्रोळी मतदार संघातील उबाठा आमदार सुनील राऊत (Sunil Raut) याची निवडणुकीतील उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केली आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सुनील राऊत शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांची कत्तल करायला कसाई पाठवणार असून निवडणूक आयोगाने रक्षण करावे, असे म्हात्रे यांनी म्हटले.

सुनील राऊत याने प्रचारा दरम्यान सुवर्णा करंजे यांचा बकरी असा उल्लेख केला होता. येत्या २० तारखेला बकरीला कापून टाकणार, असे वक्तव्य राऊत याने केले होते. तुमच्यामध्ये आल्यावर मला बरे वाटते असेही सुनील राऊत याने मुस्लिम मतदारांच्या सभेत म्हटले होते. यावर शिवसेना महिला आघाडीने सुनील राऊत याच्या वक्तव्यावर टीका केली असून त्याची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

उबाठा उमेदवाराकडून मतांसाठी विशिष्ट समाजाचे लांगुलचालन

तुम्ही एका हिंदू महिलेला कापून टाकू बोलतात. धमकी देता, कोणत्या धर्मातील मतदारांना खुश करायला तुम्ही हे बोलताय असा सवाल म्हात्रे यांनी केला. त्यापुढे म्हणाल्या की महिलांचा वारंवार अपमान करणे, त्यांना धमक्या देणे, शिवीगाळ करणे हेच उबाठाचे धोरण आहे का, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी. संजय राऊत यांनी इतर विषयांवर बोलण्यापेक्षा आधी सुनील राऊतबाबत बोलावे, असे आव्हान म्हात्रे यांनी दिले. दरम्यान, सुनील राऊत याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ (२), ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

उबाठाचा महिलांबाबत खरा चेहरा पुढे आला

अरविंद सावंत हे शायना एनसी यांना इम्पोर्टेड माल म्हणाले, आता सुनील राऊत महिलेला बकरी म्हणाले. यापूर्वी संजय राऊत हे स्वप्ना पाटकर या महिलेला शिवीगाळ करतात, हे पाहता उबाठाचा महिलांबाबत खरा चेहरा पुढे आला आहे. महिलांना तुच्छेतीची वागणूक देणारे, तिचे खच्चीकरण करणाऱ्या उबाठा उमेदवारांना राज्यातील महिला या निवडणुकीत नक्कीच गाडून टाकतील, असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून आता त्यांच्याकडून महिलांचा वारंवार अपमान करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे त्या म्हणाल्या.

सुनील राऊत हा मनोरुग्ण

सुनील राऊत हा मनोरुग्ण असून लोकप्रतिनिधी म्हणण्याच्याही लायकीचा नाही, अशी टीका करंजे यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या की, विक्रोळीत सुनील राऊतविरोधात सर्वसामान्यांमध्ये प्रचंड चीड आहे. मी तीनवेळा नगरसेवक म्हणून जे काम केले आहे त्याच्या एक टक्काही काम सुनील राऊत याने केलेले नाही. त्याने समोरासमोर चर्चा करावी, असे आव्हान करंजे यांनी दिले. प्रत्येक महिलेसोबत सुनील राऊत उद्धट आणि उर्मटपणे वागतो. यापूर्वी एका सभेत राऊतने माझा कैकयी म्हणून उल्लेख केला होता. उबाठा गट सोडून मी मूळ शिवसेनेत आले तेव्हा सुनील राऊतने कचरा गेला असे म्हटले होते मात्र हाच कचरा डोळ्यात गेल्यावर कसा डोळ्याची वाट लावतो, हे त्याला लवकरच कळेल, असा इशारा करंजे यांनी यावेळी दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -