पाहा कसे असेल वेळापत्रक?
मुंबई : माथेरानचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांसाठी ‘माथेरानची राणी’ म्हणजेच मिनीट्रेन (Matheran Mini Train) उपलब्ध करु देण्यात आली आहे. मात्र पावसाळ्याच्या कालावधीत घाटरस्ता आणि अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची भीती असल्यामुळे चार महिने ही मिनीट्रेन सेवा बंद ठेवण्यात येते. परंतु आता उद्यापासूनच ही माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे.
नेरळ – माथेरान डाऊन ट्रेन्स
- ५२१०३ नेरळ प्रस्थान सकाळी ८ वाजून ५० मिनिटे आणि माथेरान आगमन ११ वाजून ३० मिनिटे (दररोज)
- ५२१०५ नेरळ प्रस्थान १० वाजून २५ मिनिटे आणि माथेरान आगमन दुपारी १ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास (दररोज)
माथेरान – नेरळ अप ट्रेन्स - ५२१०४ माथेरान प्रस्थान दुपारी २ वाजून ४५ मिनिटे आणि नेरळ आगमन सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटे (दररोज)
- ५२१०६ माथेरान प्रस्थान दुपारी ४ वाजता आणि नेरळ आगमन सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास (दररोज)
५२१०३/५२१०४ आणि ५२१०५/५२१०६ एकूण ६ डब्यांसह चालविण्यात येतील ज्यामध्ये ३ द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन.
अमन लॉज शटल सेवा माथेरान (दैनिक)
- ५२१५४ माथेरान प्रस्थान ०८.२० वा. आणि अमन लॉज आगमन ०८.३८ वा.
- ५२१५६ माथेरान प्रस्थान ०९.१० वा. आणि अमन लॉज आगमन ०९.२८ वा.
- ५२१५८ माथेरान प्रस्थान ११.३५ वा. आणि अमन लॉज आगमन ११.५३ वा.
- ५२१६० माथेरान प्रस्थान १४.०० वा. आणि अमन लॉज आगमन १४.१८ वा.
- ५२१६२ माथेरान प्रस्थान १५.१५ वा. आणि अमन लॉज आगमन १५.३३ वा.
- ५२१६४ माथेरान प्रस्थान १७.२० वा. आणि अमन लॉज आगमन १७.३८ वा.
दरम्यान, शनिवार आणि रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहता अतिरिक्त विशेष सेवादेखील देण्यात आल्या आहेत.