मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नितीमध्ये आयुष्यात सफल आणि आनंदी राहण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. चाणक्य यांनी आपल्या निती शास्त्रातील ६व्या अध्यायाच्या १०व्या श्लोकातील एका श्लोकात म्हटले आहे की,
राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञ:पापं पुरोहित: भर्ता च स्त्रीकृतं पापं शिष्यपापं गुरुस्तथा
या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य यांनी सांगितले की आपल्याला कधी इतरांच्या चुकांचे परिणाम भोगावे लागतात.
चाणक्य म्हणतात की पती-पत्नी यांना संपूर्ण आयुष्यभर एकमेकांच्या चुकांचे परिणाम भोगावे लागतात यामुळे दोघांनीही आपल्या चुकांवर लक्ष दिले पाहिजे.
जर पती काही चुकीचे करत असेल तर त्याचे फळ पत्नीला भोगावे लागेल आणि जर पत्नी काही चुकीचे करत असेल तर त्याचे फळ पतीला भोगावे लागेल.
जेव्हा एखाद्या देशातील लोक चुकीचे काम करतात तेव्हा त्याचे फळ शासकाला भोगावे लागते. कारण शासकाची जबाबदारी अशते की जनतेने चुकीचे काम करू नये.
याच पद्धतीने जर राजा एखादी चूक करत असेल तर जनतेला त्याचे फळ भोगावे लागते. कारण त्याच्या चुकीचा प्रभाव लोकांवर पडतो.