पाकचे असे नापाक इरादे हाणून पाडावे लागतील

Share

जम्मू आणि काश्मीरमध्ये रविवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात १२ लोक जखमी झाले. रविवारी श्रीनगरच्या बाजारात प्रचंड गर्दी होती. या पूर्वी गुरुवारीही असेच हल्ले करण्यात आले होते. प्रत्यक्षात या हल्ल्यात दुसऱ्या राज्यातून काश्मीरमध्ये आलेल्या कामगारांना निशाणा बनवण्यात आले. हे हल्ले काश्मिरी युवकांकडून केले जातात की ज्यांची कोणतीही गुन्हेगाही पार्श्वभूमी नाही. हे तंत्र अत्यंत चालाखीने वापरले जाते आणि कारण कुख्यात हल्लेखोरांवर पोलिसांची नजर असते आणि स्थानिक प्रशासनाची नजर असते. त्यांना टाळून मुद्दाम या अशा असामाजिक तत्त्वांकडून असे हल्ले करण्यात येतात. हे तंत्र खास करून पाकिस्तान वापरते. त्याच तंत्राचा वापर यावेळी करण्यात आला आहे. असे लोक हत्या आणि उपद्रवाच्या प्रकरणांमध्ये दोषी असतात आणि त्यांना पकडणे पोलिसांनही अत्यंत कठीण जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच काही लोकांना लालूच दाखवून काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली होती आणि अजूनही ते सापडलेले नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच निवडणुका संपल्या आहेत आणि आता तेथे पुन्हा दहशतवाद उफाळून आला आहे. श्रीनगरमध्ये रविवारी झालेल्या बाजारात ग्रेनेड हल्ल्यांचा तोच अर्थ आहे. काश्मीरमध्ये नवे शासन सुरू झाले आहे. त्याला अतिरेक्यांचा विरोध आहे आणि पाकिस्तान कधीही काश्मीरमध्ये सुरळीत परिस्थिती सहन करणार नाही. त्यामुळे तेथील शासनाने अत्यंत योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. थंडीच्या दिवसांत पाकिस्तानी लष्कर अतिरेक्यांच्या घुसखोरीस संरक्षण देण्यास प्रसिद्ध आहे. तेच पुन्हा प्रकार सुरू झाले आहेत. श्रीनगरचा ताजा हल्ला हा त्याचाच परिपाक आहे. काही दिवसांत राज्यात बर्फ पडायला सुरुवात होईल आणि मग पाकिस्तानी सैन्याला दहशतवाद्यांच्या घुसखोरीला कुठलाही अडसर राहणार नाही. हे लक्षात घेऊन काश्मीरमध्ये लष्कराने सज्ज असले पाहिजे. खरे तर दहशतवादाचा मुद्दा आता पाकिस्तानलाही गिळून टाकत आहे. पण पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाला आसरा देण्याचे सोडत नाही.

वर्षानुवर्षे पाकिस्तानच्या मांडीवर बसून तेथील दहशतवाद्यांनी अतिरेकी कारवाया केल्या आणि अनेक निरपराध नागरिकांचे बळी घेतले. कित्येक दहशतवादी हल्ले करण्यात आले आणि आताही पाकिस्तानच्या मदतीने आणि अतिरेक्यांनी हे तंत्र सोडलेले नाही. पाकिस्तान आणि भारतातील संबंध हे कायम तणावग्रस्त राहिले आहेत. आता उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या पाठिंब्याने अतिरेक्यांनी निरपराध नागरिकांची हत्या करणे किंवा त्यांना जखमी करणे हे अनुचित आहे. अब्दुल्ला यांनी हा हल्ला अत्यंत व्यथित करणारा आहे, असे म्हटले आहे आणि त्यामुळे कोणत्याही नागरिकांना हल्ल्यात जखमी करणे समर्थनीय होऊ शकत नाही असे म्हटले आहे. ओमर अब्दुल्ला यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक वाढली आहे आणि ही बाब सहन न झाल्याने काश्मिरी दहशतवादी संतापले असण्याची शक्यता आहे. ग्रेनेड हल्ला हा अत्यंत व्यथित करणारा होता असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. पण त्यांना अतिरेक्यांनी ही सलामी दिली आहे. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालात प्रथमच दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला करून आपण काय करू शकतो याची चुणूक दाखवली आहे. ओमर अब्दुल्ला आता केवळ गर्जना करून काही तरी करणार की नुसतेच आपल्या वडिलांसारखे रडत बसणार हे पाहावे लागेल. आता राज्य सरकारच्या हातात सारे काही आहे. त्यामुळे अब्दुल्ला यांना सारे काही केंद्राच्या हाती सोपवून स्वस्थ बसता येणार नाही. त्यांना काहीतरी ठोस कृती करावी लागेल. काश्मिरी जनतेला ठोस संदेश द्यावा लागेल आणि अतिरेक्यांना कठोर इषारा द्यावा लागेल. श्रीनगरमध्ये दोन वर्षांनी झालेला हा पहिलाच हल्ला आहे.

भारताच्या सुरक्षा दलांनी खन्यार भागातील लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरला ठार केल्यांनंतर दुसऱ्या दिवशी ही घटना घडली आहे. याचा अर्थ असा होतो की, तोयबाच्या कमांडरला ठार करणे हे अतिरेक्यांच्या पचनी पडलेले दिसत नाही. रविवारी झालेला हल्ला हा आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राच्या संकुल आणि पर्यटक स्वागत केंद्राच्या जवळच आहेत. यावरून किती हा महत्त्वाचा हा भाग आहे ते लक्षात येतेच. मुळात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बंकरवर हल्ला केला होता; पण दहशतवाद्यांचा नेम चुकला आणि त्यात १२ नागरिक जखमी झाले. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पण नुसत्या निषेधाने काही होणार नाही तर स्वतः अब्दुल्ला यांना आता काहीतरी ठोस कृती करावी लागेल. ओमर अब्दुल्ला यांना आता स्वतःच मैदानात उतरून प्रखर निर्णय घ्यावे लागतील आणि मोदी यांच्या बरोबरीने अतिरेक्यांच्या नापाक इराद्यांना उत्तर द्यावे लागेल. खरे तर ही जखम राजा हरिसिंग यांच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावापासून आहे. हरिसिंग यांनी विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आणि तेव्हापासून पाकिस्तानच्या ह्यात कळ उठली. ती आजतागायत चालूच आहे. आजपर्यंत असंख्य हल्ले भारताने सोसले आहेत आणि कित्येक निरपराध नागरिकांचा बळी दिला आहे.

आता कोणत्याही परिस्थितीत ओमर अब्दुल्ला हे पळवाट काढू शकत नाहीत. त्यांना आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल आणि काश्मिरी अतिरेक्यांचा चोख बंदोबस्त करावा लागेल. काश्मीर हे भारताची शान आहे. पण शासन मात्र पुचाट राज्यकर्त्यांच्या हवाली करायचे हे चालणार नाही. एवढे जरी ओमर अब्दुल्ला यांना कळले तरी पुष्कळ झाले. जम्मू आणि काश्मीरची गादी ही सुळावरची पोळी आहे. ती ज्याला जमली त्याला ती जमली याची ओमर अब्दुल्ला यांना याची जाण ठेवावी लागेल. जे जखमी झाले त्यांच्यावर आता उपचार होतील आणि नंतर काही त्यातून बरेही होतील. पण हा हल्ला सुरक्षा दलांच्या आणि सरकारच्या कायम लक्षात राहील. यासाठी सर्वांनीच सावध राहणे आवश्यक आहे.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

5 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

44 minutes ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago