मुंबई: वास्तुनुसार किचनमध्ये हातातून काही खास गोष्टी पडणे हे अशुभ मानले जाते. या गोष्टी जर सातत्याने तुमच्या हातातून पडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जाणून घेऊया शास्त्रांमध्ये कोणत्या गोष्टी हातातून पडणे अशुभ मानले जाते.
मीठ
मीठाला शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. किचनमध्ये जेवण बनवताना मीठ पडणे हे स्वाभाविक आहे. मात्र हे जर सातत्याने होत असेल तर ते चांगले नाही. असे म्हणतात की मीठ सतत पडल्याने आर्थिक नुकसान, घरात वादविवाद होणे तसेच वाईट वेळ सुरू होण्याचे संकेत मानले जातात. पितरे नाराज असल्याकडे ही गोष्ट इशारा करते.
दूध
किचनमध्ये दूध पडणेही सामान्य आहे. मात्र हे सतत होणे पितरे आपल्यावर नाराज असल्याचे दर्शवते. याकडेही दुर्लक्ष करू नका. घरात दूध पडणे अतिशय अशुभ असते. असे म्हणतात यामुळे कामात अडथळा निर्माण होतो.
मोहरीचे तेल
शनीच्या दृष्टीदोषाासून बचावासाठी देवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते. मात्र तेल हातातून सतत पडणे हा एक अशुभ संकेत असतो. किचनमध्ये जर सातत्याने तेल पडत असेल तर आर्थिक तंगी, आरोग्यासंबंधी समस्या आणि कौटुंबिक कलहासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.