मुंबई : विमानातून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला फोन फ्लाइट मोडवर ठेवावा लागतो. त्यामुळे फोनमधील इंटरनेट सेवा पूर्णत: बंद होते. मात्र आता याबाबतच प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
आता हवाई प्रवाशांना प्रवास करताना विमानात देखील इंटरनेट वापरता (Internet In Flight) येणार आहे. मात्र विमानाने ३ हजार मीटर इतकी उंची गाठल्यानंतरच WiFi सुरू केले जाणार आहे. त्याचबरोबर विमानात विद्युत उपकरणे वापरण्यावरही बंदी घालण्यात येणार नाही.
दरम्यान, विमान ठराविक उंचीवर गेल्यानंतर तिथं इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिल्यानं जमिनीवरील सेवांवर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही. या सुविधांचे नियंत्रण वैमानिकांकडे राहणार असून गरजेनुसार ही सेवा सुरु आणि बंद करण्याचे अधिकारही त्यांच्याकडे असतील.