Wednesday, December 4, 2024
Homeताज्या घडामोडी‘मूषक आख्यान’ मध्ये ठेका धरणार गौतमी पाटील

‘मूषक आख्यान’ मध्ये ठेका धरणार गौतमी पाटील

मुंबई: वेगवेगळ्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आता ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि मध्यवर्ती भूमिकेची धुरा मकरंद अनासपुरे यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मकरंद यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. ‘मूषक आख्यान’ चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची ठसकेबाज लावणी हे ‘मूषक आख्यान’ चित्रपटाचे विशेष आकर्षण असणार आहे.

देशमाने डिजी व्हिजन’द्वारे प्रस्तुत ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाची निर्मिती सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने यांनी केली आहे. मकरंद अनासपुरे यांच्या नऊ भूमिका अत्यंत सहजपणे कथेत गुंफल्या आहेत. चित्रपटाचे लेखक हेमंत एदलाबादकर आहेत. छाया दिग्दर्शन सुप्रसिद्ध छायाचित्र दिग्दर्शक सुरेश देशमाने यांचे आहे. हर्षदा पोरे कल्लुरकर यांनी लिहिलेल्या गीतांना अतुल दिवे यांनी संगीतबद्ध केले आहे. गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजातील गाणी खूपच श्रवणीय झाली आहेत.

संकलन अनंत कामत तर पार्श्वसंगीत अभिजित हेगडे यांचे आहे. व्हीएफएक्स अरविंद हतनुरकर तर साउंड डिझाईनची जबाबदारी मयूर वैद्य यांनी सांभाळली आहे सह-छायांकन जगदीश देशमाने यांचे आहे.‘मूषक आख्यान’ चित्रपटात  मकरंद अनासपुरे ,भरत सावले, प्रकाश भागवत, नितीन कुलकर्णी, राजू सोनावणे, अमर सोनावणे, स्वाती देशमुख, रुचिरा जाधव यांच्या लक्षणीय भूमिका आहेत. पोस्ट प्रॉडक्शन रश मिडिया,अन्वय उत्तम नायकोडी, रंगभूषा- कुंदन दिवेकर, वेशभूषा- माधुरी मोरे यांचे आहे. या चित्रपटात अर्क चित्रांचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला आहे आणि ही अर्क चित्रे नागपूरचे व्यंगचित्रकार उमेश चारोळे यांनी केली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -