मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. गृहविभगाने त्यानंतर विवेक फळसणकर यांना प्रभारी महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सोपविला होता. मात्र आता राज्याच्या पोलीस महासंचालकपदी आयपीएस दर्जाचे अधिकारी असणारे संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाविकास आघाडी आणि अन्य पक्षांच्या तक्रारीनंतर रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले होते. त्यानंतर विवेक फळसणकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता संजय वर्मा हे राज्याचे नवीन पोलीस महासंचालक असणार आहेत.
कॉँग्रेस आणि अन्य पक्षांच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ल यांना डिजीपी पदावरून हटवले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी ३ नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विवेक फळसणकर, रितेश कुमार, संजय वर्मा, ही तीन नावे देण्यात आली होती. अखेर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय वर्मा यांचा अल्पपरिचय
१९९० च्या बॅचचे संजय वर्मा आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रात सध्या ते कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी संजय वर्मा यांचे नाव आघाडीवर होते. एप्रिल २०२८ मध्ये ते पोलीस सेवेतून निवृत्त होतील
अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, मात्र काँग्रेसकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीबाबत अडथळे निर्माण केले जात आहेत. २० नोव्हेंबरपूर्वी त्यांची बदली करण्याची विनंती काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. ते वादग्रस्त अधिकारी असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोगाला पत्रही पाठवले होते. जोपर्यंत ते या पदावर आहेत, तोपर्यंत राज्यात निष्पक्ष निवडणुका घेणे कठीण जाईल, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.