मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(IPL 2025)साठीच्या खेळाडूंच्या मेगा लिलावाच्या तारखांची घोषणा झाली आहे. २४ आणि २५ नोव्हेंबर २०२४ला सौदी अरेबियाच्या जेद्दामध्ये लिलाव केला जाईल. जेद्दाच्या अबादी अल जोहर एरिनामध्ये लिलाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येतून १० मिनिटांच्या अंतरावर स्थित हॉटेल शांगरीलामध्ये खेळाडू आणि इतर लोकांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आयपीएलच्या ऑथॉरिटीकडून सांगण्यात आले आहे की त्यांची संचालन टीम व्हिसा आणि लॉजिस्टिक्स आवश्यकतांसाठी सर्व खेळाडू आणि इतर स्टाफच्या संपर्कात राहतील.
१० फ्रेंचायझी खर्च करू शकणार ६४१.५ कोटी
या वर्षीचा लिलाव मोठा आहे. यात ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि अर्शदीप सिंह सारखे भारताचे हाय प्रोफाईल स्टार सामील आहेत. १० फ्रेंचायजीकडून एकूण मिळून २०४ स्लॉट खर्च करण्यासाठी साधारण ६४१.५ कोटी रूपये असतील. या २०४ स्लॉटमध्ये ७० परदेशी खेळाडूंसाठी निर्धारित आहे. आतापर्यंत १० फ्रेंचायझीने ४६ खेळाडूंना रिटेन केले आहे. यांचा एकूण खर्च ५५८.५ कोटी रूपये आहे.