Monday, December 9, 2024
Homeताज्या घडामोडीगोळी खाऊन स्टॅमिना वाढवणं जीवावर बेतलं!

गोळी खाऊन स्टॅमिना वाढवणं जीवावर बेतलं!

गुजरातमधील व्यक्तीचा मुंबईत संशयास्पद मृत्यू, ‘त्या’ औषधांनी वाढवला गुंता

मुंबई : लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी तसेच सेक्सचा कालावधी वाढवण्यासाठी लोक विविध प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. यांपैकी बहुतांश औषधांवर बंदी घालण्यात आलेली आहे. या औषधांच्या सेवनामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. तरीही धोका पत्करूु अनेकजण या गोळी खाऊन स्टॅमिना वाठवण्याचा प्रयत्न करतात आणि प्रसंगी जीव गमावून बसतात. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. एका विचित्र घटनेने मुंबई हादरली असून, या घटनेची माहिती समोर येताच खळबळ माजली आहे.

गुजरातच्या सूरत येथील एका व्यक्तीचा मुंबईतील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळला असून, त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ६.१५ मिनिटांनी हॉटेलच्या मॅनेजरने पोलिसांना फोन करत हॉटेलमधील एका व्यक्ती रुममध्ये बेशुद्धावस्थेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव संजय कुमार रामजीभाई तिवारी, वय ४२ वर्षे असे आहे. त्याच्याविषयीची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने त्याला जेजे रुग्णालयात नेले, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. तिवारी होता त्याच रुममध्ये त्यांच्यासोबत १४ वर्षीय अल्पवयीन मुलगीसुद्धा होती, असे तपासात समोर आले आहे.

तिवारीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला असता त्याने या मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. मुलीच्या पालकांच्या जबाबानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली.

मुलीच्या पालकांच्या जबाबानंतर पोलिसांनी Bombay Nursing and Sanitization (BNS) Act आणि पोक्सो कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली. तर, मुंबईतील डी बी मार्ग पोलीस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद करत भारतीय दंडसंविधानाच्या कलम 137(2), 64(1), 65(1), 336(2), 336(3) आणि 340(2) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे

दरम्यान, पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार तिवारी आणि अल्पवयीन मुलगी असणा-या हॉटेलच्या रुममधून काही औषधं ताब्यात घेण्यात आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार तिवारीने अती प्रमाणात ही औषधे घेतल्याचा तर्कही वर्तवला जात असल्याने तपास यंत्रणाही चक्रावली. दरम्यान, सध्या मृत व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून, या इसमाने या औषधांचे सेवन किती प्रमाणात आणि केले होते का? याची माहिती समोर येऊ शकणार आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -