Monday, May 12, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Gold Silver Rate : ग्राहकांना दिलासा! दिवाळीनंतर सोनं-चांदीच्या दरात घसरण

Gold Silver Rate : ग्राहकांना दिलासा! दिवाळीनंतर सोनं-चांदीच्या दरात घसरण

मुंबई : दिवाळी सणाच्या काळात सोनं-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Rate Today) मोठी वाढ झाली होती. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत होती. मात्र आता दिवाळी सणानंतर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण (Price Decrease) झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज चांदीच्या दरात १२४ रुपयांची घसरण झाली असून ९४ हजार १६० रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. त्याचबरोबर २४ कॅरेट सोन्याच्या दरात १६० रुपयांची घट झाली असून आज सोनं प्रतितोळा ८० हजार २४० रुपयांवर स्थिरावले आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात १५० रुपयांनी घसरले असून प्रतितोळा ७३ हजार ५५९ रुपये वर १८ कॅरेट सोन्याची किंमत १२० रुपयांनी घसरुन ६० हजार १८० रुपयांवर स्थिरावली आहे.


दरम्यान, तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला सुरुवात होत असून यावेळी सोन्याच्या मागणीतही मोठी वाढ होते. त्यामुळे याकाळात पुन्हा सोनं चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment