पुणे : मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत शहरात सर्वाधिक ६० ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये काही ठिकाणी नुकसान झाले. परंतु सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नाही.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशामक दलाकडून ‘सुरक्षित दिवाळी, आनंदी दिवाळी’ मोहीम राबविण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.
शहर आणि उपनगरांमध्ये दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे शुक्रवारी सर्वाधिक आगीच्या ३६ घटना घडल्या. पाडव्याच्या दिवशी १४ ठिकाणी आणि भाऊबीजेच्या दिवशी फटाक्यांमुळे चार ठिकाणी आग लागली, अशी माहिती अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.