Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Smartphoneमध्ये मुले खूप सोशल मीडियाचा वापर करतायत का? आजच करा ही सेटिंग

Smartphoneमध्ये मुले खूप सोशल मीडियाचा वापर करतायत का? आजच करा ही सेटिंग

मुंबई: आजकाल सोशल मीडियाची क्रेझ प्रत्येक वयोगाटाच्या लोकांमध्ये पाहायला मिळते. मुलेही यापासून कसे वेगळे राहतील. मात्र मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर आई-वडिलांनी लक्ष ठेवले पाहिजे. कारण यामुळे मानसिक आणि शारिरीक विकासावर वाईट परिणाम होऊ शकतो.


जर तुमची मुलेही स्मार्टफोनवर सोशल मीडियाचा वापर करत आहेत तर काही सेटिंग्स करून तुम्ही याचा वापर कमी करू शकता.



कंटेट फिल्टरिंग आणि पॅरेंटल कंट्रोल्स


तुमच्या माहितीसाठी सांगत होत की स्मार्टफोनमध्ये कंटेट फिल्टरिंग आणि पॅरेंटल कंट्रोल सेटि्गसला अॅक्टिव्हेट करणे गरजेचे असते. गुगल प्ले स्टोर आणि अॅपल स्टोरमध्ये असे काही अॅप्स उपलब्ध आहेत जे मुलांसाठीचा खराब कंटेट ब्लॉक करतात. याशिवाय तुम्ही यूट्यूब आणि इतर सोशल मिडिया अॅप्समध्ये तुम्ही किड्स मोडही अॅक्टिव्हेट करू शकता.



Screen Time Limit सेट करा


मुलांच्या स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्क्रीन टाईम लिमिट सेट करा. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये हा पर्याय असतो की एका निश्चित काळानंतर हे अॅप्स लॉक करू शकतात.



Notification बंद करा


सोशल मीडियामधून येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे मुलांचे लक्ष त्याकडे खेचले जाते. यामुळे त्या अॅप्सचे नोटिफिकेशन बंद करा ज्यांचा वापर ते करतात. यामुळे मुले सतत फोन चेक करत राहणार नाही.

Comments
Add Comment