Monday, December 9, 2024
Homeताज्या घडामोडीचिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आमने सामने

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आमने सामने

रत्नागिरी: चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्यात थेट लढत आहे.

शेखर निकम यांना त्यांच्या वडिलांपासून राजकारणाचा वारसा आहे. त्यातही श्री. शेखर निकम यांची स्वच्छ आणि सुसंस्कृत आमदार अशी प्रतिमा आहे. प्रशांत यादव तुलनेने नवखे आहेत. शरद पवार यांची अलीकडेच भव्य सभा चिपळूणला झाली होती. त्याचा प्रभाव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा त्या भागात असलेला प्रभाव याचा उपयोग प्रशांत यादव यांना कितपत होतो, हे पाहावे लागेल. प्रशांत यादव याच नावाचा आणखी एक उमेदवार तसेच शेखर निकम या नावाचाही आणखी एक उमेदवार चिपळूणमध्ये निवडणूक लढवत आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत अपेक्षित आहे.

चिपळूणमधील उमेदवावर पुढील प्रमाणे

१.प्रशांत बबन यादव – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद्चंद्र पवार

२.शेखर गोविंदराव निकम- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-अजित पवार

३.सौ. अनघा राजेश कांगणे – अपक्ष, प्रशांत भगवान यादव- अपक्ष

४.महेंद्र जयराम पवार – अपक्ष, शेखर गंगाराम निकम- अपक्ष.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -