मुंबई: या आठवड्यात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती सीझन १६ या लोकप्रिय ज्ञान आधारित गेम शोमध्ये ८ ते १५ वयोगटातील प्रतिभावान मुले ‘KBC ज्युनियर’ अंतर्गत हॉट सीटवर दिसतील. त्यापैकी एक स्पर्धक आहे दिल्लीचा भाविक गर्ग. पाचवीत शिकणारा हा विद्यार्थी परिपक्व दिसतो आणि त्याला भारतीय इतिहासाविषयी जाणून घेण्यात रुची आहे.
अमिताभ बच्चन या छोट्या भाविकला म्हणतात, “माझ्या कम्प्युटर खूप हुशार आहे. त्याने मला सांगितले आहे की तू एक पुस्तक लिहिले आहेस.” त्यावर भाविकने खुलासा केला की अजून त्याचे पुस्तकाचे लिखाण सुरू आहे आणि त्या पुस्तकाचे नाव आहे ‘हिस्टरी ऑफ इंडिया’. तो पुढे म्हणाला की, त्याने या पुस्तकाची ८६ पाने लिहून पूर्ण केली आहेत. ते प्रकाशित करून त्याची एक प्रत श्री. बच्चन यांना देण्याचे त्याने ठरवले आहे. यावर, श्री. बच्चन यांनी भाविकला वचन दिले की, भाविकने त्यांना इतके प्रभावित केले आहे की, ते भाविकच्या पुस्तकाचे छायाचित्र त्यावर स्वाक्षरी करून आपल्या सोशल मीडियावर नक्की पोस्ट करतील.
भाविकशी बोलता बोलता बिग बी आपल्या भूतकाळातील आठवणींत रमले. त्याने नैनीताल येथील आपले शाळेचे दिवस आठवले. बोर्डिंग स्कूलमधला रोमांच त्यांना आठवला. अज्ञाताच्या थरारासह अंधारात बिबट्या असल्याच्या शक्यतेने त्यांना जी भीती वाटली होती तो किस्सा त्यांनी सांगितला. ते म्हणाले, “एक दिवस एक माणूस धावतपळत आला आणि त्याने सांगितले की एक बिबट्या आला आहे. जमावात घाबरगुंडी उडाली. काही लोक भीतीने जागच्या जागी गोठले, तर काहींनी त्या बिबट्याचा सामना करण्यासाठी हॉकी स्टिक, टेनिस रॅकेट वगैरे जे हातात आले ते घेतले. त्यांनी झुडुपांच्या मागे शोध घेतला तेव्हा त्यांना बिबट्याची शेपूट दिसली आणि ते गर्भगळित झाले. सगळेजण सैरावैरा धावत आपल्या शाळेत परतले. त्यांच्यात एक मुलगा होता, जो त्याच्या आरोग्य समस्येमुळे जरा बाजूला बसायचा आणि सगळ्यांच्यात क्वचितच खेळायचा कारण त्याला खेळायला मना केले होते. पण त्यालाही बिबट्याला बघण्याची उत्सुकता वाटली. माझा लहान भाऊ, जो त्याच शाळेत शिकत होता, तो हे बघून थक्क झाला की हा मुलगा जो एरवी इतका शांत बसलेला असतो तो आज सगळ्यांपेक्षा जलद धावतो आहे. माझ्या भावाने सांगितले की, त्याने त्याच्या जवळून अत्यंत वेगाने एक आवाज जाताना ऐकला तेव्हा त्याला वाटले की तो बिबट्याच असावा पण पाहिले तर तो मुलगा वेगाने धावत होता! स्वतःचे आरोग्य ठीक नसतानाही, तेथून निसटण्याच्या उर्मीने तो इतका जलद धावत होता की ते पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. आमच्या शाळेत असे बरेच काही व्हायचे!” असा किस्सा सांगून बिग बी दिलखुलास हसले.
बघत रहा, कौन बनेगा करोडपती ज्युनिअर्स अमिताभ बच्चनच्या सोबत, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!