‘या’ तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : हॉरर शोबद्दल बोलतो तेव्हा लोकांच्या ओठावर पहिले नाव येते ते या ‘आहट’ (Aahat Horror Show). या मालिकेने तब्बल २० वर्षे प्रेक्षकांना घाबरवले. अजूनही या शो’ने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच घर तयार केले आहे. अशातच आता ही मालिका तब्बल २० वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे सोनी मराठीवर (Sony Marathi) ‘आहट’ हा हॉरर शो आता मराठीमध्ये प्रसारित केला जाणार आहे.
सोनी मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘आहट’ या शोचा प्रोमो शेअर केला गेला असून “सगळीकडे पसरणार भीतीचे सावट, कारण येत आहे ‘आहट’! आता मराठीत” असे कॅप्शन देण्यात आले आहे. येत्या ७ नोव्हेंबरपासून शुक्रवार ते रविवार रात्री १०.३० वाजता ही मालिका दिसणार आहे.
View this post on Instagram