मुंबई: जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही असा एका सिनेमातील डायलॉग आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात निरोगी जीवन जगणे महत्त्वाचे असते. अनेकदा महिला घरच्या जबाबदाऱ्यांमुळे आपल्या आरोग्यावर लक्ष देऊ शकत नाही. मात्र कोणत्याही वयात त्या थोडीशी लाईफस्टाईल बदलून आपले आरोग्य चांगले राखू शकतात. तसेच आजारांपासून बचाव करू शकतात.
फिजीकल अॅक्टिव्हिटी
एक्सरसाईज करणाऱ्या महिलांचा ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य असते. त्यांच्यामध्ये हृदयरोग, डायबिटीज आणि डिमेंशियासारखे आजार होत नाहीत.
पुरेशी झोप घ्या
आधुनिक लाईफस्टाईलमुळे अनेक महिलांना रात्री झोप घेणे कठीण होते. मात्र आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये झोपेलाही तितकीच प्राथमिकता देणे महत्त्वाचे आहे. रिलॅक्स फील करण्यासाठी झोप अतिशय गरजेची आहे.
वार्षिक चेकअप
महिलांचे वार्षिक चेकअप होणे गरजेचे असते. त्यामुळे गंभीर आजारांचा धोका वेळीच ओळखता येतो.
डाएटवर द्या लक्ष
हेल्दी जेवण म्हणजे बेचव अन्न नव्हे तर असे खाणे ज्यात प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट आणि कार्बोहायड्रेटचा समावेश असेल. यासाठी तुम्ही जेवणात रंगीबेरंगी भाज्या आणि फळे खाऊ शकते. अख्के धान्य तसेच ताजे जेवण आहारात असेल याचा प्रयत्न करा.
आवडीचे काम करा
अनेकदा आपल्या आवडीचे काम केल्याने आपल्याला आतून आनंद मिळतो. त्यामुळे मन प्रसन्न होईल अशा गोष्टी करा.