Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजश्रध्दा-संस्कृती

Vinayak Chaturthi : विनायक चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ११०० नारळांचा महानैवेद्य!

Vinayak Chaturthi : विनायक चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ११०० नारळांचा महानैवेद्य!

पुणे : विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi 2024) हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. याशिवाय व्यक्तीला सुख, समृद्धी, शांती, यश आणि ज्ञानाचा आशीर्वादही मिळतो. तसेच गणेशाच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, असेही मानले जाते. त्यामुळे आज राज्यभरात श्री गणरायाची पूजा केली जाते.


अशातच आज विनायक चतुर्थीनिमित्त पुण्यातील 'दगडू शेठ हलवाई गणपती'चीदेखील (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati) मोठ्या जल्लोषात पूजा करण्यात आली असून गणरायाला यावेळी ११०० नारळांचा महानैवेद्य दाखवण्यात आला.


यावेळी गायन, तबला साथ, ऑक्टपॅड वादन अशा कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकाची मोठी गर्दी जमली आहे.

Comments
Add Comment