मुंबई: वरुण धवनने आजपर्यंत अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ‘स्टुडंट्स ऑफ द इअर’ सिनेमातून वरुण अभिनय क्षेत्रात उतरला. कधी रोमँटिक तर कधी थ्रिलर भूमिकेतून त्याने प्रेक्षकांना प्रेमात पाडले.अशातच वरुणने प्रेक्षकांना नव्या चित्रपटाचा टीझर रिलीज करुन आगामी चित्रपटाबद्दल खुशखबर दिली आहे. यात वरुण रावडी अंदाजात पाहायला मिळतो आहे.
शारुख खानच्या जवान चित्रपटाचा दिग्दर्शक ॲटली याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे . जॅकी श्रॉफ या सिनेमात खलनायकाची भूमिका बजावत आहे.