Saturday, October 11, 2025

मोठी बातमी : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; निवडणूक आयोगाने...

मोठी बातमी : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; निवडणूक आयोगाने...
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची अखेर बदली झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे. रश्मी शुक्ला महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅप केल्याचे आरोप यांच्यावर आहेत. रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसून येतंय. उद्या (5 नोव्हेंबर) दुपारी १ वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यावर सोपवण्यात आला आहे. राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड लवकरच केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी काँग्रेसने केली होती. विरोधकांचे फोन टॅप रश्मी शुक्ला केल्या प्रकरणी यांच्यावर गुन्हे दाखल होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली. शुक्ला यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पटोले यांनी पत्र लिहित निवडणूक आयोगाला केली. पटोलेंनी शुक्ला या भाजपला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांनी देखील रश्मी शुक्ला यांच्या बदलीची वारंवार मागणी केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.      
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >