मुंबई: जर तुम्ही भारतीय स्टेट बँक युजर आहात तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. खरंतर, सध्या फसवणुकीच्या घटना वेगाने वाढत आहे. फसवणूकदार फसवणूक करण्यासाठी विविध पद्धती वापरत आहेत. सध्या लोकांना बँकेच्या नावावर मेसेज पाठवले जात आहेत. या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे.
युजर्स लिंकवर क्लिक करण्यासाठी विविध ऑफर्स देत आहेत. काही असेच एसबीआय युजर्ससोबत घडत आहे. मात्र एसबीआयने आपल्या युजर्ससाठी इशारा जारी केला आहे. जाणून घ्या डिटेलबाबत…
भारतीय स्टेट बँकने आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे. यात असे म्हटले आहे की काही लोक एसबीआयच्या नावाने नकली मेसेज पाठवत आहेत. हे मेसेज व्हॉट्सअॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून पाठवले जात आहेत. या मेसेजमध्ये म्हटले आहे की तुमचे एसबीआय रिवॉर्ड पॉईंट्स लवकर संपणार आहेत. अशातच ते लवकरात लवकर रिडीम करा.
मेसेजमध्ये एक लिंकही देण्यात आली आहे. एसबीआयने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. यात एसबीआयने स्पष्ट केले आहे की बँकेकडून कधीही अशा प्रकारचे मेसेजेस येत नाहीत. यासाठी ग्राहकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 4, 2024
एसबीआय रिवार्ड पॉईंट्स
एसबीआय आपल्या ग्राहकांना नेहमी ट्रान्झॅक्शनवर रिवार्ड पॉईंट्स पाठवत असते. प्रत्येक पॉईंट्सची किंमत २५ पैसे असते. या रिवार्ड पॉईंट्सचा वापर तुम्ही कोणत्याही प्रॉडक्ट अथवा सर्व्हिसेस खरेदीसाठी करू शकता. यात कपडे, सिनेमाचे तिकीट, मोबाईल अथवा डीटीएच रिचार्ज यांचा समावेश करू शकता.