मुंबई: स्मार्टफोन निर्माता कंपनी Realmeने आज आपला नवा ५जी स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. Realme GT 7 Pro मध्ये १६ जीबी रॅमसह दमदार बॅटरीही देण्यात आली आहे. यामुळे फोन दीर्घकाळपर्यंत चार्ज राहता येते. दरम्यान, हा स्मार्टफोन कंपनीने आता चीनमध्ये लाँच केला आहे. भारतात हा स्मार्टफोन २६ नोव्हेंबरला लाँच होणार आहे.
Realme GT 7 Pro
: फीचर्स
Realme GT 7 Proमध्ये कंपनीने ६.७८ इंचाचा OLED प्स डिस्प्ले उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय हा स्मार्टफोन लेटेस्ट प्रोसेसर Snapdragon 8 Eliteवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रिनो 830 GPU प्रोसेसर देण्यात आला आहे. इतकंच नव्हे या फोनमध्ये १२ जीबी आणि १६ जीबी रॅम सारखे दोन पर्याय आहेत. तर कंपनीने १ टीबीपर्यंत स्टोरेजचा पर्याय दिला आहे.
Realme GT 7 Pro: कॅमेरा
या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने यात ५०एमपीचा प्रायमरी कॅमेरासह ५० एएमपीचा टेलिफोटो कॅमेरा आणि एक ८ मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा दिला आहे. हा फोन १२० एक्सपर्यंत हायब्रिड फोकसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी डिव्हाईसमध्ये १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
यात ६५०० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी १२० वॉटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय फोनमध्ये इन डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सॉर, इन्फ्रारेड सेन्सर, आयपी ६८ स्टिरीओ स्पीकर्स आणि टाईप सी चार्जिंग या सुविधा आहे.
किंमत
१२जीबी +२५६ जीबी स्टोरेजच्या डिव्हाईसची किंमत ३६९९ युआन(साधारण ४३ हजार रूपये) आहे. तर १६ जीबी +२५६ जीबी स्टोरेजची किंमत ३८९९ युआन (४६ हजार रूपये). फोनच्या १२ जीबी + ५१२ जीबी मॉडेलची किंमत ३९९९ युआन(साधारण ४७ हजार रूपये) आहे. तर याच्या १६ जीबी + ५१२ जीबी मॉडेलची किंमत ४२९९ युआन आणि १६ जीबी+१ टीबी मॉडेलची किंमत (साधारण ५६ हजार रूपये) आहे.