मुंबई: दिवाळीत काहीतरी क्रिएटिव्ह (Creative) करण्याची हौस प्रत्येकाला असते. दिवाळी म्हटली की दिव्यांचा सण,फराळ, फटाके आणि घरासमोर काढलेली रांगोळी आपल्या डोळ्यासमोर येते. चित्रकला, हस्तकला, शिल्पकला अशा विविध कलाकृती करण्यासाठी आपल्या हातांमध्ये तसे कौशल्य असायला हवे. या सर्व कला सरावाचा भाग आहेत.
करीरोड मध्ये राहणा-या वैष्णवी मनोहर माईणकर हिने दिवाळी निमित्त ‘प्यार हुआ इकरार हुआ’ ह्या गाण्यातील नरगीस आणि राज कपूर यांची हुबेहुब रांगोळी काढली.ही रांगोळी काढायला तिला १६ तास लागले अस ती म्हणाली.गुरुकुल स्कुल ऑफ आर्टस लालबाग मधुन वैष्णवीने चित्रकलेचे धडे गिरवले. तिच्या ह्या कौशल्याच श्रेय ती गुरुकुल स्कुल ऑफ आर्टस च्या शिक्षकांना देते.