Friday, May 9, 2025

ठाणेराजकीयमहत्वाची बातमी

Raj Thackeray : राज ठाकरे आज फोडणार प्रचाराचा नारळ!

Raj Thackeray : राज ठाकरे आज फोडणार प्रचाराचा नारळ!

पहिली जाहीर सभा डोंबिवलीत तर दुसरी ठाण्यात होणार


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची राज्यातील पहिली जाहीर सभा डोंबिवलीत तर दुसरी सभा ठाण्यात होणार आहे.


सोमवारी (४ नोव्हेंबर २०२४) होणाऱ्या या सभांच्या निमित्ताने राज ठाकरे हे ठाणे जिल्ह्यात निवडणूक प्रचाराचा नारळ मनसे नेते प्रमोद (राजू) पाटील यांच्या डोंबिवलीतील सभेत फोडणार आहेत. ही जाहीर सभा कल्याण पश्चिमचे उमेदवार उल्हास भोईर, उल्हासनगरचे उमेदवार भगवान भालेराव, मुरबाडच्या उमेदवार संगीताताई चेंदवणकर यांच्यासाठी असणार आहे.


तसेच दुसरी जाहिस सभा मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासाठी ठाण्यात होईल, सदर सभा संदीप पाचंगे, कळवा मुंब्रा उमेदवार सुशांत सुर्यराव आणि मिराभाईंदर उमेदवार संदीप राणे यांच्यासाठीही असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.



पहिली सभा डोंबिवली आ.प्रमोद (राजू) पाटील


वेळ: सायं ४.०० वाजता


स्थळ: श्री महावैष्णव मारुती मंदिर, पी & टी कॉलनी चौक, डोंबिवली (पूर्व)



दुसरी सभा- ठाणे उमेदवार अविनाश जाधव


वेळ: सायं ६.०० वाजता


स्थळ: ब्रम्हांड सर्कल, आझादनगर, ठाणे



राज ठाकरे ६ नोव्हेबरला मंगळवेढा दौऱ्यावर


राज ठाकरे हे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच मंगळवेढा दौऱ्यावर सहा नोव्हेंबर रोजी येत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे यांनी दिली. विधानसभेच्या आखाड्यामध्ये उमेदवार उतरण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली त्याचवेळी पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिल्या पाच उमेदवारात दिलीप धोत्रे यांचे नाव निश्चित केल्यामुळे या निवडणुकीच्या आखाड्यात रंगत निर्माण झाली. दिलीप धोत्रे यांनीही या मतदारसंघात अधिक सक्रिय होत मतदारसंघातील प्रश्नावर आवाज उठवण्याची भूमिका सुरू केली. विशेषता राज ठाकरे यांनी पंढरपूर मतदारसंघांमध्ये वैयक्तिक लक्ष घातले असून गत महिन्यामध्ये तालुक्यातील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेस युवासेना अध्यक्ष अमित ठाकरे हे उपस्थित राहिले.

Comments
Add Comment