Saturday, May 10, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

४ दिवसांत सुरू होणार मालिका, कर्णधार बदलला, कोच बदलले, भारतीय संघ आफ्रिकेत पोहोचला

४ दिवसांत सुरू होणार मालिका, कर्णधार बदलला, कोच बदलले, भारतीय संघ आफ्रिकेत पोहोचला

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत मिळाला व्हाईटवॉश विसरायला बराच वेळ लागेल. यातच आता वेगळ्या फॉरमॅटसह वेगळा कर्णधार आणि वेगळ्या कोचसह टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला पोहोचली आहे. ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात परदेशी दौऱ्यावर पोहोचला आहे.


बीसीसीआयने संघ पोहोचल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत संघाचे मुख्य कोच म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण दिसतील. या दौऱ्यात चार टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना ९ नोव्हेंबरला किंग्समीडमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा सामना १० तारखेला सेंट जॉर्ज ओव्हलमध्ये खेळवला जाईल. तिसरा टी-२० सामना सुपरस्पोर्ट पार्कमध्ये असणार आहे. तर शेवटचा सामना वांडरर्स स्टेडियममध्ये होईल.



टी-२० मालिकेचे वेळापत्रक


पहिला टी-२० सामना- ८ नोव्हेंबर, किंग्समीड
दुसरा टी-२० सामना - १० नोव्हेंबर, सेंट जॉर्ज ओवल
तिसरा टी-२० सामना - १३ नोव्हेंबर, सुपरस्पोर्ट पार्क
चौथा टी-२० सामना - १५ नोव्हेंबर, वाँडरर्स स्टेडियम



टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ


सूर्यकुमार यादव(कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(विकेटकीपर), रिंकु सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा(विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंह, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, विजयकुमार, आवेश खान आणि यश दयाल.

Comments
Add Comment