Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीIran Hijab Protest : हिजाब सक्तीच्या विरोधात निर्वस्त्र होत आंदोलन करणा-या 'त्या'...

Iran Hijab Protest : हिजाब सक्तीच्या विरोधात निर्वस्त्र होत आंदोलन करणा-या ‘त्या’ विद्यार्थीनीला पोलिसांनी बलात्कार करून ठार मारले! नक्की काय आहे हा प्रकार..?

तेहरान : इराणमध्ये मुस्लीम महिलांना जबरदस्तीने हिजाब घालण्याची सक्ती केली जात आहे. या सक्तीविरोधात इराणमधील महिलांनी मागिल काही वर्षापासून आंदोलन (Iran Hijab Protest) छेडले आहे. यात अनेक महिलांचा बळू गेलेला आहे. नुकतेच इराणच्या विद्यापीठातही विद्यार्थी आणि महिलांना हिजाबसक्ती करण्यात आली आहे. या सक्तीविरोधात एका विद्यार्थीनीने (Ahoo Daryaei) निर्वस्त्र होत आंदोलन केले. सदर आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची माहिती जगभरात पसरली.

इराणच्या इस्लामिक आझाद विद्यापीठातील एक महिला निर्वस्त्र होऊन विद्यापीठ संकुलात वावरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. इराणी विद्यार्थ्यांशी संबंधित अमीर कबीर या वृत्तसंकेतस्थळाने सदर व्हिडीओ पहिल्यांदा पोस्ट केला. त्यानंतर पर्शियन भाषेतील प्रमुख माध्यमांनी सदर व्हिडीओची दखल घेतली आणि हाहा म्हणता हा व्हिडीओ जगभरात पसरला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठावर टीका होऊ लागली. यानंतर विद्यापीठाचे प्रवक्ते अमीर महजूब यांनी एक्सवर पोस्ट टाकत आपली बाजू मांडली. ते म्हणाले, “पोलिसांच्या चौकशीत सदर विद्यार्थीनी मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे.”

परंतू, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सदर विद्यार्थीनी आता कुठे आहे याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. इराणच्या हमशहरी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीनंतर विद्यार्थीनीला मनोरुग्णालयात पाठविण्यात आले.

आंदोलनकारी विद्यार्थीनीला ताब्यात घेताना मारहाण करण्यात आल्याचा दावा अमीर कबीर वृत्तसंकेतस्थळाने केला आहे. यानंतर ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. इराणने सदर विद्यार्थीनीला ताबडतोब सोडले पाहीजे, अशी मागणी करण्यात आली आहे. तिला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असून तात्काळ वकील नेमून द्यावा आणि कुटुंबाला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे आता या मुलीबाबतचा तपशील समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेहरान युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी ही मुलगी हिजाबशिवाय युनिव्हर्सिटीच्या समोरच्या रस्त्यावरून चालत होती. त्यावेळी इराणच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला थांबवले आणि मारहाण केली. त्यानंतर तिनेही पोलिसांवर हात उगरला. तेव्हा एका पोलीस कर्मचाऱ्याने तिचा शर्ट फाडला. त्यानंतर तिने संतापाच्या भरात स्वतः तिची पॅन्ट काढली आणि तेहरानच्या रस्त्यावर फिरत राहिली.

तुम्हाला मारले जाईल असे लोक ओरडत राहिले पण आतून जणू मृत्यूची भीतीच संपली असल्याचे या मुलीने दाखवून दिले. या इराणी विद्यार्थिनीचा तिथल्या नैतिक पोलिसांनी तिला हिजाब घालण्यास भाग पाडल्याबद्दल छळ केला. म्हणून तिने सार्वजनिकपणे तिचे सर्व कपडे काढले आणि तीही हसत हसत मरणाला सामोरे गेली.

इराणमध्ये असा कायदा आहे की कोणत्याही महिलेला फाशी देण्यापूर्वी किंवा पोलिसांनी मारण्यापूर्वी बलात्कार केला जातो जेणेकरून ती अपवित्र होते आणि स्वर्गात प्रवेश करू शकत नाही. तिच्यासोबतही असेच करण्यात आले अशा प्रकारचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ती अपवित्र होऊन स्वर्गात प्रवेश करू नये म्हणून अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली, असे अनेकांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

दरम्यान, तिचे वडील रडत रडत म्हणाले, अल्ला, माझ्या मुलीला पुन्हा इराणमध्ये जन्म देऊ नकोस आणि इराणमध्ये पुन्हा कोणत्याही मुलीला जन्म देऊ नकोस, हा नरक आहे, हा नरक आहे.

याआधीही, २०२२ साली इराणमध्ये हिजाब विरोधात आंदोलन उसळले होते. म्हासा अमिनी या महिलेने हिजाबशी संबंधित नियम मोडल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. मात्र अटकेत असतानाच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणमधील महिलांनी रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त केला होता. आंदोलक महिलांनी एकत्र येत डोक्यावरचा हिजाब काढून त्याची सामूहिक होळी पेटवली होती. हे आंदोलन दडपण्यासाठी इराणी सरकारने बळाचा वापर केला, ज्यामध्ये ५५१ जणांचा मृत्यू झाला होता. तर हजारो लोकांना अटक झाली होती. आता पून्हा एकदा हे आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -