Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीदहावी परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

दहावी परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार ६ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. तर व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भरायचे आहेत. त्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र आता अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे.

माध्यमिक शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची माहिती भरून मंडळाकडे पाठवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाइन भरायचे असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमार्फत अर्ज भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अर्जात भरलेली माहितीची पडताळणी करून ती अचूक असल्याची खात्री शाळांनी करावी. विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रीलिस्ट ४ डिसेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करायच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -