मुंबई : राज्यातून मान्सून माघारी गेला असून आता मुंबईत वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे, हवेतील प्रदुषणही झपाट्याने वाढू लागले आहे. खराब वाऱ्यामुळे आकाशात धुक्याची चादर पसरली आहे. त्यात आता दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. यामुळे मुंबईतील प्रदूषित हवेमुळे फुफ्फुसाच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाल्याने डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
पाऊस परतल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील वायू प्रदूषणात वाढ झाल्याने महापालिका प्रशासन हैराण झाले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक १३५ म्हणजेच धोकादायक पातळीवर होता. यासोबतच कुलाब्यात १५५, म्हणजेच समाधानकारक एक्यूआय नोंदवण्यात आला होता. तर, माझगावमध्ये ८९ एक्यूआय होता. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकात वाढ झाल्यामुळे आकाशात धुक्याचा दाट थर दिसून आला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डव्हान्स्ड सायन्सेसचे चेअर प्रोफेसर डॉ. गुफरान बेग यांच्या मते, वाऱ्याच्या मंद गतीमुळे मुंबईचा एक्यूआय बिघडला आहे.
देवनारमध्ये १५४, बोरिवलीमध्ये १४९, वरळीमध्ये १४९, वांद्रेमध्ये १४२, कुर्लामध्ये १३४, सायनमध्ये ११७, पवईमध्ये ११५, भांडुपमध्ये ११२, जुहूमध्ये १०७, मालाड येथे १०५ एक्यूआय नोंदवण्यात आले. या सर्व भागात हवेचा दर्जा निर्देशांक धोकादायक पातळीवर असल्याचे आढळून आले. यासह, सीएसएमटी परिसरात ८१ म्हणजेच समाधानकारक एक्यूआय नोंदवण्यात आला होता. तर, माझगावमध्ये ८९ एक्यूआय होता. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकात वाढ झाल्यामुळे आकाशात धुक्याचा दाट थर दिसून आला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डव्हान्स्ड सायन्सेसचे चेअर प्रोफेसर डॉ. गुफरान बेग यांच्या मते, वाऱ्याच्या मंद गतीमुळे मुंबईचा एक्यूआय बिघडला आहे.
आठ महिन्यांत ७५ जणांचा मृत्यू
लहान मुलांमध्ये अॅलर्जी होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोविडनंतर वातावरणात बदल झाला आहे. मुलांच्या शरीरात आजारांविरोधातील रोगप्रतिकारकशक्ती तयार झाली नाही. आता वातावरणातील बदल आणि शरीराला होणाऱ्या संसर्गामुळे त्यांच्या श्वसन नलिकेवर परिणाम होतो. गेल्या मे महिन्यात खोकल्याचे रुग्ण कमी झाले होते. पण आता लहान मुलांमध्ये पुन्हा खोकला, दमा आणि श्वसन नलिकेसंदर्भातील समस्या वाढल्या आहेत. रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढल्याचे एसआरसीसी रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. इंदू खोसला यांनी सांगितले.