Monday, December 9, 2024
Homeक्रीडान्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर पुढील मालिकेत कापला जाणार गौतम गंभीरचा पत्ता, या दिग्गजाकडे जबाबदारी!

न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर पुढील मालिकेत कापला जाणार गौतम गंभीरचा पत्ता, या दिग्गजाकडे जबाबदारी!

मुंबई: टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या कसोटी मालिकेत ३-० असा पराभव सहन करावा लागला. हा भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिलाच असा क्षण होता जेव्हा एखाद्या संघाने भारताला भारतात व्हाईटवॉश दिला. भारताला हा लाजिरवाणा पराभव रोहित शर्माच्या नेतृत्वात आणि गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये झेलावा लागला. आता टीम इंडिया पुढील मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. यात गंभीर कोच म्हणून असणार नाही.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चार सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. याची सुरूवात ८ नोव्हेंबरासून होईल तर समाप्ती १५ नोव्हेंबरला होईल. यातच टीम इंडियाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे आहे. अशातच गंभीरला टीम इंडियासोबत आफ्रिका दौऱ्यावर जाणे शक्य नाही.

आफ्रिका दौऱ्यावर गंभीरच्या जागी व्ही व्हीएस लक्ष्मणला टीम इंडियाचे हेड कोच म्हणून संधी मिळेल. असे यासाठी कारण आधी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही मालिका ठरलेली नव्हती. लक्ष्मणसोबत साईराज बहुतुले, ऋषिकेश कानिटकर आणि सुभादीप घोषही आफ्रिका दौऱ्यात कोचिंग स्टाफसोबत दिसतील.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, विजयकुमार वैशाक, आवेश खान, यश दयाल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -