तोडगा काढून नितेश राणे यांनी उबाठा प्रणित बेस्ट कामगार सेनेचा संप अयशस्वी केला
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा सानुग्रह अनुदान देण्याबाबत आज दिनांक ०४/११/२४ रोजी बेस्टचे महाव्यवस्थापक श्री.अनिल डिग्गीकर यांच्या समवेत समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी केलेला पाठपुरावा आणि मध्यस्थीनंतर आज बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्या सोबत झालेल्या मीटिंग मध्ये या आठवड्यात मुंबई महापालिका प्रमाणे २९००० बोनासचा निधी बेस्ट कडे आलेला आहे तो याच आठवड्यात कामगारांच्या खात्यावर जमा केला जाईल व कोरोना भत्ता याला आचासंहितेमुळे निवडणूक आयोगाची मंजुरीची आवश्यकता आहे त्यासाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले त्याचीही मंजुरीही मिळेल, त्या नंतर बोनस आणि कोविड भत्ता जमा करण्यात येईल असे बेस्टचे महाव्यवस्थापक यांच्याकडून आश्र्वासित करण्यात आले.
संघटनेचे सरचिटणीस विलास पवार यांनी दिनांक ०३/११/२४ व ०४/११/२४ यादिवशी कोणतीही रजा मंजूर होणार नाही असे बेस्ट कडून पत्रक काढण्यात आले होते पण त्या दिवशीच्या कामगारांच्या रजा मंजूर करण्यात यावेत ही मागणी करण्यात आली त्यावर महाव्यवस्थापक यांनी सकारात्मकता दर्शवली.
दरवर्षी दिवाळी अगोदर होणार बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस यावर्षी झाला नव्हता. ऐन दिवाळीत ३ आणि ४ नोव्हेंबरला उबाठा प्रणित बेस्ट कामगार सेनेने संपाचा दिलेला इशारा आणि यामुळे विस्कळीत होणारे मुंबईकरांचे जनजीवन लक्षात घेऊन आमदार नितेश राणे यांनी महाव्यवस्थापकांशी सतत संपर्कात राहून यावर यशस्वी तोडगा काढला.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस विलास पवार, खजिनदार विनोद राणे, उपाध्यक्ष प्रकाश राणे, प्रदीप कुडव, राजेंद्र दळी, विवेक शिर्सेकर, रवि कुंचेकुर्वे, गुरू महाडेश्वर, भुषण झाजम आदी उपस्थित होते.