Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Assembly Election : उबाठाची गळती थांबेना! तीन माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

Assembly Election : उबाठाची गळती थांबेना! तीन माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

भाईंदर : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रणधुमाळीत उबाठाला (UBT Shivsena) पुन्हा एकदा गळती लागली असून उबाठा गटाचे तीन नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख, शहरप्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच काँग्रेसची एक नगरसेविका आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.


भाईंदर पूर्वेकडील उबाठा गटाचे माजी नगरसेवक जयंतीलाल पाटील, माजी नगरसेवक अरविंद ठाकूर आणि माजी नगरसेविका सुनिता पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच उप जिल्हाप्रमुख जयराम मेसे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संतोष पेंडूरकर, अनिल साबळे, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, युवा सेना प्रमुख पूर्वेश सरनाईक इत्यादी उपस्थित होते.

Comments
Add Comment