Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीHealth News : ‘हा’ आजार ठरतोय धोकादायक; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल!

Health News : ‘हा’ आजार ठरतोय धोकादायक; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल!

नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या महामारीनंतरही जगाला अजूनही विविध आजारांचा विळखा असल्याचे दिसून येते. अशातच आरोग्य संघटनेने (World Health Organization) एका धोकादायक आजाराचा अहवाल मांडला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, टीबी (क्षयरोग) अत्यंत घातक संसर्गजन्य असा आजार आहे. हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज फैलावू शकतो. त्यामुळे टीबी कोरोना पेक्षा अधिक घातक आजार असल्याचे समोर आले आहे.

भारतात टीबीचे सर्वाधिक रुग्ण

भारतात टीबीचे २६ टक्के रुग्ण आहेत. इंडोनेशिया १० टक्के, चीन ६.८ टक्के, फिलिपिन्स ६.८ टक्के आणि पाकिस्तानात ६.३ टक्के क्षयरोगाचे रुग्ण आहेत. ग्लोबल ट्यूबरकॉलॉसिस रिपोर्ट २०२४ नुसार या आजाराचे जगभरात ५६ टक्के रुग्ण आहेत. जगभरात हा आजार ५५ टक्के पुरुषांत, ३३ टक्के महिलांत तर १२ टक्के लहान मुलांमध्ये आढळून येतो. सन २०२५ पर्यंत भारतातून या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पण सध्याच्या परिस्थितीत भारतातच या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

दरम्यान, सध्या या आजारावर उपचार उपलब्ध असून उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. मात्र उपचारास उशीर झाला तर रुग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका असतो. त्यामुळे टीबीची काहीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांसी संपर्क करावा.

काय आहेत टीबीची लक्षणे

खोकला येणे, खोकल्याबरोबर रक्त येणे, छातीत वेदना होणे, श्वास घेण्यास आणि खाकरण्यास त्रास होणे, ताप, थंडी वाजून येणे, रात्रीच्या वेळेस घाम येणे, वजन कमी होणे, थकवा जाणवणे. क्षयरोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे या आजारात सारखा खोकला येत राहतो. तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ हा खोकला येत राहिला तर तुम्ही तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -