Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Accident News : भीषण अपघात! बोलेरोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच जणांना चिरडले

Accident News : भीषण अपघात! बोलेरोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच जणांना चिरडले

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. लोय पिंपळोद गावाजवळ एका बोलेरा गाडीने रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री आठ वाजेच्या सुमारास नंदूरबार ते धानोरा रस्त्यावर एक दुचाकी खराब झाली होती. या ठिकाणी आणखीही दोन दुचाकी थांबलेल्या होत्या. त्याच वेळी धानोरा गावाकडे भरधाव वेगात एक बोलेरो जीप निघाली होती. या जीपचा दुचाकीला धडकून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की तीन दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला. बोलेरोही उलटून पडली. तसेच दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातातील एका जखमी व्यक्तीला नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Comments
Add Comment