सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच मंगळवेढा दौऱ्यावर सहा नोव्हेंबर रोजी येत असल्याची माहिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे यांनी दिली.
विधानसभेच्या आखाड्यामध्ये उमेदवार उतरण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. त्याचवेळी पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिल्या पाच उमेदवारात दिलीप धोत्रे यांचे नाव निश्चित केल्यामुळे या निवडणुकीच्या आखाड्यात रंगत निर्माण झाली आहे.