Friday, October 24, 2025
Happy Diwali

IND vs NZ : न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताला धक्का!

IND vs NZ : न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताला धक्का!

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमधील पहिले स्थान गमावले

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मायदेशातील मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये भारताची अव्वल स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. मुंबईत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने भारताचा २५ धावांनी पराभव करत ३-० असा विजय मिळवला. भारतीय संघ १९९९- २००० नंतर प्रथमच कसोटीत स्विप झाला आहे. त्यानंतर संघाचा दक्षिण आफ्रिकेकडून २-० असा पराभव झाला.

किमान तीन सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. डब्लूटीसीच्या चालू चक्रातील भारताचा हा पाचवा पराभव आहे. त्यामुळे त्याच्या गुणांच्या टक्केवारीत (पीसीटी) मोठी घसरण झाली. संघाच्या गुणांची टक्केवारी ६२.८२ वरून ५८.३३ वर घसरली. भारत अशा प्रकारे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या मागे दुसऱ्या स्थानावर घसरला आहे, ज्याने ६२. ५० च्या पीसीटीसह अव्वल स्थान पटकावले आहे. पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी भारताला आता ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे आहे. या मालिकेचे महत्त्व आता वाढले आहे कारण दोन्ही संघांमध्ये अव्वल दोन स्थानांसाठी स्पर्धा होणार आहे. न्यूझीलंड मालिकेपूर्वी, भारत सलग तिसऱ्यांदा डब्लूटीसी फायनल खेळण्याचा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता. दरम्यान, न्यूझीलंडच्या भारतातील ऐतिहासिक मालिका विजयामुळे त्यांच्या डब्लूटीसी अंतिम आकांक्षा बळकट झाल्या आहेत. न्यूझीलंड ५४. ५५ च्या पीसीटीसह चौथ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५५.५६ च्या पीसीटीसह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका ५४.१७ च्या पीसीटीसह पाचव्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा