Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीJammu Kashmir : श्रीनगरमधील ‘संडे मार्केट’मध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला!

Jammu Kashmir : श्रीनगरमधील ‘संडे मार्केट’मध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला!

स्फोटानंतर लाल चौकात घबराट

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी रविवारी दुपारी एका बाजारात गर्दीच्या वेळी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात १५ नागरिक जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान, संरक्षण दलाने घटनास्थळ व आसपासच्या भागात शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच श्रीनगरमधील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. स्फोटानंतर लाल चौकात घबराट पसरली असून, परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाने घेराबंदी केली आहे.

याबाबत माहिती अशी की,दहशतवाद्यांनी टीआरसीजवळ तुफान गर्दी असलेल्या बाजारपेठेत ग्रेनेड फेकले.ज्यामुळे गोंधळ झाला.लोक सैरावैरा धावू लागले. या हल्ल्यात सहापेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. मात्र,अद्याप हल्लेखोरांपैकी कोणीही पोलिसांच्या अथवा सुरक्षा दलांच्या हाती लागलेला नाही. या हल्ल्याशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी गेल्या महिन्यातील एका रविवारी काही स्थलांतरित नागरिकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, दहशतवाद्यांनी एका डॉक्टरचीही देखील हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. हत्या करण्यात आलेले मजूर बोगद्याच्या प्रकल्पावर काम करत होते. काम करत असतानाच त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दरम्यान,या दहशतवादी हल्ल्याचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.ज्यामध्ये दहशतवादी बंदुका दाखवत आहेत. दोन्ही दहशतवाद्यांचे चेहरे या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहेत. या दहशतवाद्यांच्या हातात अमेरिकन बनावटीची एम-४ कार्बाइन रायफल व एके-४७ रायफल दिसत आहे.

गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात स्थलांतरित कामगारांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. दहशतवाद्यांनी रात्री साडेसातच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याजवळ हल्ला केला. यावेळी काही मजूर काम करत होते, तर काहीजण काम थांबवून जेवण करण्यासाठी तिथून बाहेर पडत होते. या हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचून परिसरात सुरक्षा वाढवली. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचण्याआधीच दहशतवादी तिथून फरार झाले होते. बोगद्याचं काम जिथे सुरू आहे, तिथून जवळच मजुरांची राहण्याची व्यवस्था आहे. एक बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -