पुणे : पुण्यात दिवाळी पाडव्याची दिवशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काल रात्री शहरात घरगुती गॅस सिलिंडरचे दोन ठिकाणी स्फोट झाक्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात दोन घरगुती सिलेंडरचे स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.