मुंबई: खजूर तर सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. मात्र पुरुषांपेक्षा जास्त महिलांसाठी हे चांगले असते. महिलांनी रिकाम्या पोटी २ खजूर खाल्ल्यास अधिक फायदे होतात.
प्रजननासाठी चांगले
खजूर प्रजनन क्षमतेपासून ते ओव्ह्युलेशन, हार्मोन संतुलन आणि प्रसवासाठी मदत करते. खजुरामुळे नैसर्गिक प्रसवाची शक्यता अधिक वाढते.
गर्भावस्थेत पोषण
गर्भावस्थेदरम्यान शरीरास अधिक पोषणाची गरज असते. त्यामुळे यादरम्यान खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात फोलेटचे प्रमाण अधिक असते. यात बी व्हिटामिन असते जे बाळाच्या विकासासाठी महत्त्वाचे असते.
हाडांचे आरोग्य
खजुरामध्ये बोरॉन असते हे एक असे खनिज आहे जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. खजुराच्या नियमित सेवनाने हाडांचे आरोग्य चांगले राहते.
केसांचे आरोग्य
खजुरामध्ये आर्यन मोठ्या प्रमाणात असते. जे स्काल्पमध्ये रक्त प्रवाहाला चालना देते. तसेच केसांच्या विकासासाठी मदत करते.
त्वचेचे आरोग्य
खजुरामद्ये व्हिटामिन सी आणि डी भरपूर प्रमाणात असते. यामुळे कोलेजनचा विकास होतो.
मेंदू तल्लख होतो
खजुरामध्ये अँटीऑक्सिडंट असतात यामुळे मेंदूचे कार्य चांगले होते. खजुरामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता कमी असते.